STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

यापुढेही असणार काय ?

यापुढेही असणार काय ?

1 min
13K


क्तांचे सडे

संवेदनाहीन धडे

बेवारस मढे 

यापुढेही असणार काय ?

वांझ बेटे

शापीत वाडे

ठार वेडे

यापुढेही असणार काय ?

संधीसाधू नेते

केवळ भोक्ते

उदासीन मते

यापुढेही असणार काय ? 

मुठभर भामटे

पोटाला चिमटे

फळाविना काटे

यापुढेही असणार काय ?

कंपन्यांना टाळे

आदर्श घोटाळे

निष्फळ आश्वासने

यापुढेही असणार काय? 

धर्मभेदी दरी

परकीयांची घुसखोरी

निष्फळ परदेशवारी

यापुढेही असणार काय? 

दारिद्र्य, बेकारी, भ्रष्टाचार

'अर्थ' पूर्ण व्यवहार

त्रिशंकू सरकार

यापुढेही असणार काय? 

सर्व्हेचं लोढणं मास्तरांना

उपोषणाची झंझट अण्णांना

लिंबु शरबत पाजणे मुख्यमंत्र्यांना

यापुढेही असणार काय?

अवखळ, खळाळता निर्झर

चपखल पानांची सळसळ

सुखाची हिरवळ

यापुढेही असणार काय ?

 

 

           

 

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational