वटसावित्री
वटसावित्री
भल्या पहाटे तिला जाग येते.
अन् मी मात्र स्वप्नात रमलेला असतो.
ती जगते माझ्यासाठी,
करते धावपळ आयुष्याची.
माझा डबा न चुकता
ती वेळेवर तयार करते
अन् स्वत: मात्र कधी कधी उपाशी राहते.
तिचा वाढदिवस माझ्या लक्षात राहत नाही.
तिच्या आजारपणात मला रजा मिळत नाही.
ती थकलेली मला कधी कळत नाही.
तिच्यासाठी प्रेमाचे दोन शब्द मी बोलत नाही.
तिचा फोन मी लवकर कट करतो,
कामात बिझी असल्याने पून्हा फोन करेन म्हणतो.
पण पुन्हा कधी उगवत नाही.
तरी तिच्या मनातील माझी काळजी कधीच कमी होत नाही.
सारं सारं मला कळत,
पण तिच्यासाठी वेळ मिळत नाही.
तरी ती कधीच तक्रार करत नाही.
अन् न चुकता वटसावित्रीला
सात फेऱ्या मारायचं विसरत नाही.
