बाहुबली
बाहुबली
कांदे,बटाटे,टमाटे,वांगे, मिरच्या,..,.
मातीमोल भावाने खरेदी करताना
कधी आमच्या आसवाचां भाव
केलाय का?
तुरी साठी रांगा लावताना आयुष्याची दंगल झाली.
बाहुबली साठी रांगा लावताना तुम्हांला लाज नाही वाटली.
आज आमच्या संपाने तुम्हाला काय फरक पडणार,
पैशाच्या जोरावर तुम्ही परदेशातून अन्नधान्य आणणार!
बाहुबली आठ दिवसात बाराशे कोटी
अन् भाजीपाल्याच्या नशिबी
महागाई पराकोटीची!
उभ्या जगाचा पोशिदां
मी शेतकरी राजा
कथा कवितातच शोभून दिसतो
अन् प्रत्यक्षात मात्र गरीबीचं
जिण जगून भाकरीसाठी
मरणाला सुद्धा तारण ठेवतो!
कर्जमाफी नाही म्हणून आत्महत्या!
गणवेश नाही म्हणून
आत्महत्या!
पास काढायला पैसे नाही
म्हणून आत्महत्या!
ही आमची जगण्याची परिभाषा,
अरे तेवढया पैशाचे पॉपकॉर्न
तर तुम्ही बाहुबली पाहताना
खाल्लेत रे!
का आमच जगण महाग
अन् मरण स्वस्त करताय!
महागाईच्या नावाने ओरड करून बाहुबली बाराशे कोटीवर नेऊन ठेवताय!
अन् खऱ्या बाहुबलीला मात्र अस्मान दाखवताय!
