यातना
यातना
1 min
27.1K
गर्द काळोख्या रात्री
चंद्र मातला होता
मला मिटवण्यासाठी
अंधार पसरला होता ||
आभाळ कोसळताना
धरतीही फाटली होती
अंतरीची वेदना माझी
कोणास कळली होती ||
तुटून गेल्या चांदण्या
बेचिराख मला करून
वेदनाच्या सागरात
पहाट गेली हरवून ||
उडून गेली पाखरे
घरटयाची वाट पाहून
स्वप्नाच्या रानातली
आस गेली वाहून ||
सोडून सुखाची आशा
यातना मोजत आहे
पुन्हा नव्याने जगायला
आता श्वास घेत आहे ||
