मी,,,,
मी,,,,
काळोख्या अंधारात
मी
सूर्य झाकला होता.
दुःखाच्या बाजारात
मी
सौदा सुखाचा केला होता.
अविचाराच्या बाजारात
मी
सुविचार विकला होता
भ्रष्टाचाराच्या दलदलीत
मी
शिष्टाचार पेरला होता.
जातीच्या राजकारणात
मी
रंग बदलला होता.
सोसून यातना साऱ्या
मी
अन्यायावर प्रहार केला होता
विरोध झाला माझ्या कवितेला
मी
विद्रोह शब्दात माडंला होता.
📱7588512467
जि.प.प्रा.शा.लिंगदरी
औरंगाबाद.
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
