ती सध्या काय करते
ती सध्या काय करते
आठवणीच्या हिंदोळ्यावर
काळजात दुःख सलते
मन स्वतःला विचारते
ती सध्या काय करते ||
आरशात रूप पाहताना
प्रेमभावना तिला छळते
हरवलो मी यातनात
ती सध्या काय करते ||
चटका लागला जीवाला
दुनियादारीत ती हरते
ऊन सावलीचा खेळ जुना
ती सध्या काय करते ||
नशिबाचा फेरा चुकला
मनात प्रेमाला ठेवते
व्यवहार नाही समजला
ती सध्या काय करते ||
विरहाच्या वेदनांनी
क्षणाक्षणाला ती मरते
मी सुद्धा सरणावर
ती सध्या काय करते

