वसुंधरा ( सहाक्षरी )
वसुंधरा ( सहाक्षरी )
पहा वसुंधरा
दिसे नटलेली
भासे नववधु
शृंगार ल्यालेली ॥१॥
गडद हिरवे
धमक पिवळे
रंग नवतीचे
चौफेर उधळे ॥२॥
गीत पाखरांचे
गुंजते आकाशी
वृक्ष ही खंबीर
घट्ट मुळापाशी ॥३॥
पशू, पक्षी, जीव
सोसते तो भार
देते मुखी घास
ती पालनहार ॥४॥
वाहती निर्झर
नदीत सागर
पहा पाषाणात
फुटती पाझर ॥५॥
फळांचा गोडवा
ठेवा अमृृताचा
गंध या फुलांचा
जसा अत्तराचा ॥६॥
जीवन निर्मीती
तीच खरी माता
माना उपकार
हात जोडा आता ॥७॥
सजिवा निर्जीवा
देत असे थारा
आदी आणि अंत
तीच वसुंधरा ॥८॥