Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

वसंत ऋतू

वसंत ऋतू

1 min
154


ऋतू वसंत

खाण सौंदर्याची 

देन निसर्गाची

तो आसमंत ... १


फुला फळांची

झाली पखरण

आनंदाचा क्षण

ठेव मनाची ... २


 मंजुळ रव

कोकीळ कुजन

आनंदाचा क्षण

सुखानुभव ... ३


फुलली सारी

करवंद जाळी

एकेक डहाळी

दिसते भारी ... ४


आंब्याच्या वनी

सुवास सुटला

आनंद दाटला

सार्‍यांच्या मनी ... ५


फणस गरे

बरका रसाळ

फळांचा सुकाळ

पोटास बरे ... ६ 


गौर चैत्राची 

सजली नटली

मनी आनंदली

लेक मानाची ... ७


स्त्रियांचा मान

दिले आमंत्रण 

चैत्राचा हा सण

केला हो छान ... ८


पन्हे कैरीचे

आंब्याची हो डाळ

आनंदाचा काळ

सुख मनीचे ... ९


असा वसंत

आनंदाचा ठेवा

मनात जपावा

नसेच अंत ... १०



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational