वसंत ऋतू
वसंत ऋतू
ठुमकत ठुमकत ऋतुराज आला
निसर्गाला ईश्वराचा स्पर्श झाला
संपला शिशिरातला पर्णभार
युवावस्थामध्ये निसर्ग आला
नाही अहंकार निसर्गात
उधळण होते रंगांची
झटकला सुर्यदेवाने आळस
मोहर सुगंधित गंधाची
चेरीच्या झाडांचा बहर
पर्ण फुटी ऐवजी येती फुले
सृष्टीच्या कर्णात झुलती
पाना फुलांचे रमणीय डूले
सुष्टी साजरी करते उत्सव
आम्रमोहोर, प्राजक्ताची लाली
अदमास नाही पावसाचा तरी
चमत्कारिक कोवळी नवपालवी
सुख आणि दुःख ऋतुप्रमाणे
हजेरी आयुष्यात लावतात
आनंद घ्यावा सगळ्याच ऋतूत
जगण्याचा हाच संदेश देतात
