विश्वास
विश्वास
जीवनात जितका महत्वाचा श्वास
तितकाच महत्त्वाचा आहे विश्वास !!
नात्याचा पाया आहे विश्वास
त्यावरच उभारते नाते खास !!
यशस्वी होण्याची धरा कास
ठेवूनी मनाशी आत्मविश्वास !!
ज्याच्या परिवारामध्ये विश्वास
त्याचा खूप सुंदर जीवनप्रवास !!
घरात पसरला विश्वासाचा सुवास
पृथ्वीवर भासे स्वर्गाचा आभास !!
