विरोधाभास
विरोधाभास
मी अशा जगात रहाते ,
जिथे चप्पल - बुटांपासून काहीही घेणे असते एक स्वप्न...
मनाजोगत्या गोष्टींसाठी पायथा घालावा लागतो जुना बाजार,
सापडलीच मनासारखी गोष्ट तर करावी लागते घासाघीस नाही तर पुनः धुंडाळावा लागतो बाजार...
वाढदिवसाच्या केकसाठी महिनाभर आधीपासून करावी लागते जुळवाजुळव. ..
पोट भरण्यासाठी डोंबाऱ्याच्या
कितीतरी कसरती अन् खेळ
जगण्याच्या शर्यतीत माझही एक पाउल पुढे
एवढच एक समाधान ...
सणवार साजरे करण्यासाठी करावी लागते उधारउसनवार,
कधी कधी तर स्वतःला विकण्याचीही
असते तयारी. ..
पण घेणाऱ्यालाही हवी असते नां थोडीबहूत श्रीमंती ...
घर संसाराचं रहाटगाडं सुरूच रहात,
जराही उसंत मिळत नाही,
कोणताही लेखाजोखा कधी मांडताच येत नाही
जे येत ते रितच होत जातं,
उण्यातून - उण्याकडून झेपावत जातं ...
मी अशा जगात रहाते,
जिथे नसते कशालाही किंमत
आजचं उद्या होते जूनं ...
गरज म्हणून काहीच नाही ,
इतरांना दिसणंच महत्वाचं
सेलिब्रेशनसाठी लागत नाही कोणतच कारण
रोजच् जल्लोष अन् रोजच पाटर्य़ा
उधळण्याकडून - उधळण्याकडे हाही प्रवास रितेपणाचाच ...
पै - पै जमवणं काय नी पै - पै उधळणं काय ?
शेवटी शून्यवतच होतं ...
शेवटी शून्यातून होत ...
