विद्याधन
विद्याधन


साद माझी ऐका तुम्ही
ठेवा खुले डोळे, कान
विद्याधन असे श्रेष्ठ
तयामुळे असे मान।।धृ।।
राजा असो वा भिकारी
असा मोठे वा लहान
जयाठायी असे विद्या
तोचि मनुष्य महान।।1।।
आई, कुटुंब, शेजारी
परिसर गुरु छान
निसर्गही शिकवितो
राहू द्यावे हेचि भान।।2।।
बालपणी विद्यालयी
गुरुजन देती ज्ञान
होई कौतुक वा शिक्षा
सदा राखू त्यांचा मान।।3।।
नित्य विद्या जया अंगी
जगी त्याला मानपान
वंदी त्यासी नर नारी
होई सभेत सन्मान।।4।।
ज्ञान आहे सर्वांसाठी
मोठा किंवा जरी सान
नाही बंधन कोणते
गावे कोणी विद्यागान।।5।।
ग्रंथ आणि पुस्तके
शोभे खरी विद्याखाण
दिसामाजी वाचनाची
ठेवू मनी नित्य जाण।।6।।
कमी ना होते दिल्याने
वाढे हे परमदान
देऊ धन हे इतरा
करू आता विद्यादान।।7।।