STORYMIRROR

Sailee Rane

Inspirational

3  

Sailee Rane

Inspirational

विधाता

विधाता

1 min
680



विधात्याची कल्पना मूर्त की अमूर्त

माहीत नाही तो कुठे असतो


पण भेटेल जेव्हा मला तो देव

म्हणेन देवा साऱ्यांनाच सुखात ठेव


पण साऱ्यांसाठी काही मागताना

मला मात्र रितेच ठेवलस देवा


सुख सारं देता देता अलगद

सारंच हिरावून घेतलंस देवा


सारं सारं काही दिलंस मला

पण संसारसुखच कमी दिलंस मला


का रे विधात्या?असा कोणता केलाय गुन्हा?

म्हणूनच तर हे असलं फुटकं नशीब दिलंस मला


नको होते रे मला बाकी काही

हवं होतं थोडंसंच आनंदमय जगणं


तेही नाही दिलंस हे विधात्या

मग जगायचा अधिकारच का दिलास ?


या एकटेपणात जगताना

साऱ्यांच्याच नजरा भेडसावतात रे


नको झालंय हे जीणं एकाकीपणाचे

अजून किती सोसायचेत रे दिवस हलाखीचे


माझे हे सारे प्रश्न केवळ तुझ्याचसाठी

कारण तूच असतोस म्हणे भाग्यविधाता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational