होळी
होळी


आला रे आला सण होळीचा
रंग देण्याचा रंग घेण्याचा
विसर पडो साऱ्या भेदभावांचा
रंग चढू दे साऱ्यांना एकतेचा
साजरा करताय सण होळीचा
विसरू नका आजार कोरोना व्हायरसचा
जपून खेळून घ्या आनंद रंगांचा
सर्वांनी मिळून करू मुकाबला रोगांचा
>घ्या स्वतः काळजी ,सांगा नातलगांना
एकजुटीने जाऊ सामोरे संकटांना
काळजी घेता स्वतःची घ्याल काळजी जगाची
होळीच्या दिवशी बळ मिळू दे प्रयत्नांना
चला करू साजरी होळी आनंदाने
दिवस आनंदी करू पुरणपोळीने
चेहऱ्यावरील दुःखावर मुखवटा चढवा रंगाने
करा स्वागत या सणाचे हर्षभराने