मान्य नाही मला
मान्य नाही मला
1 min
727
मान्य नाही मला
तिला कोणी डिवचलेले
मान्य नाही मला
तिला कोणी हिणवलेले
मान्य नाही मला
ती एक स्त्री आहे
म्हणून तिच्याकडे वाईट नजरेने पाहिलेले
खरेच मान्य नाही मला
ती एक स्त्री आहे म्हणून
तिला कमी लेखलेले
एकदा का झाली रणचण्डिका
तर दाखवून देईल तिचा कणखरपणा
