STORYMIRROR

Sailee Rane

Inspirational

3  

Sailee Rane

Inspirational

गुरू

गुरू

1 min
218

गुरूंचा महिमा कसा वर्णावा

शब्द पडती अपुरे तयासाठी

कितीही केली पराकाष्ठा

कमीच असे त्या गुरूंसाठी


गुरूंनीच दिला ज्ञानाचा प्रकाश

अंधारमय जीवनात उजेडाची वाट

त्यांच्याविना जीवन व्यर्थची वाटे

नाही होत तयांविना सुखाची पहाट


आयुष्याला वळण लावले तयांनी

आज जी घडली तयांमुळेच

जीवनाला माझ्या मिळाले पंख

आकाशी मी उडते तयांमुळेच


गुरूपुढे होते नतमस्तक आता

तयांच्या चरणी ठेवून माथा

आयुष्यात कितीही झाली मोठी

तरीही गाईन माझ्या गुरूंच्याच गाथा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational