वेळेचे मोल...
वेळेचे मोल...
घड्याळाच्या काट्यांनो
थांबा ना रे जरा
जरा धावा हळूहळू
का रे फिरता गरागरा
सकाळी सकाळी कसे
छान झोपावेसे वाटते
घड्याळाकडे बघ जरा
आई दुलई ओढून घेते
टिक टिक करण्याशिवाय
दुसरे नाही का रे काम
दुसऱ्यांना तरी करू द्याना
बाबांनो! थोडासा आराम
परीक्षा जवळ आली की
तुमचा वेग वाढतो भारी
पेपर आहे आज बाळा
तुझी झाली ना तयारी
स्कूलबस जोर जोरात
हॉर्न वाजवित असते
धावण्याची शर्यत तेव्हा
काट्यांची सुरू होते
शाळा सुटण्याची वेळही
काट्यांना बरी कळते
अन् रुसून बसतात काटे
त्यांची टिक टिक मंद होते
तारांबळ पाहून माझी
एकदा काटेच लागले बोलू
बाळा! वेळ भारी मोलाची
तुलाही कळेल हळूहळू
