कधी कधी वेडं व्हावं...
कधी कधी वेडं व्हावं...
वेडं व्हावं पेढं खावं
जुने लोक म्हणायचे
कधी कधी वेडं व्हावं
तेव्हा मला वाटायचे
अर्थ कुठे कळायचा
दिसायचे फक्त पेढे
आता कळते मजला
सोपे नाही हे तेवढे
वेड धरा अभ्यासाचे
कधी व्हा वाचनवेडे
सुंदरसे हस्ताक्षर
एक कलाकार घडे
ध्येयाप्रती वेडे व्हावे
स्वप्न मोठे ते पाहावे
सीमेवर लढणारे
त्यांचे वेड सर्वा ठावे
गाणी गाणं हेही वेड
वेड गाणी ऐकण्याचे
भलेभले होती वेडे
फळ हे आराधनेचे
कधी कधी वेडं व्हावं
अशासाठी म्हणायचे
स्वप्नपूर्तीसाठी वेडे
अभिप्रेत असायचे
