वारी पंढरीची
वारी पंढरीची
वारी पंढरीची आस विठूच्या भेटीची।
याद त्याची येता सुटे ओढ संसाराची।।
बहू शिणलो रे देवा आता या संसारी।
जीवनाची नाव माझी लाव तू किनारी।।
भव सागराची खोली आहे तरी किती।
कटेवरी हात तुझे मार्ग दाखविती।।
देवाची पंढरी भासे वैकुंठ भूवरी।
शोभून दिसते मूर्ती सावळी गोजिरी।।
पंढरीच्या वारीमध्ये नाही भेदाभेद।
सान थोर सारे तिथे लुटती आनंद।।
दिंड्या पताका घेऊन वैष्णव नाचती।
आनंद सोहळ्यामध्ये न्हाऊन निघती।।
गोडी लागो देवा आम्हा तुझ्या दर्शनाची।
वारी पंढरीची असे पुण्याई जन्माची।।