STORYMIRROR

Umakant Kale

Inspirational Others

0  

Umakant Kale

Inspirational Others

वार्धक्याचे वृद्धाश्रम

वार्धक्याचे वृद्धाश्रम

1 min
551


तारुण्य ओसारले ,पडल्या सुरकुत्या

थकले हात पाय ,आता वार्धक्याचे निशाण

पाणावले डोळे, भंगली स्वप्ने आमची

वृद्धाश्रम हीच आमची आता निशाण

घर सुटले, तुटल्या विश्वासाच्या भिंती

नात्यांची दोर कमजोर, मुले झाली परकी

थरथरणारे हात, तोल जातो मनी

उरले फक्त आसू, ती पण वाटे परकी

नसून भासे, एकांताचा तो खेळ नवा

दु:खाच्या पंखावर होऊन स्वार 

हसतो भुतकाळातील स्पंदनावर

पेलतो धिर देत हा जगण्याचा भार

जिवनाचा हा दुसरा पाडाव,वृद्धाश्रम

संसाराची पुन्हा सुरुवात वृद्धिंगत

प्रवासी हो जो-तो तर येथे यायचा

आता आम्ही तर उद्या तुम्ही हीच वृद्धिंगत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational