वाढदिवसाच्या शुभेच्छा...!
वाढदिवसाच्या शुभेच्छा...!
आज माझा जन्म दिवस
सर्वांनी मला खूप शुभेच्छा दिल्या
पण खरं सांगू
संध्याकाळ झाली
अन मी मोकळी मोकळी झाले
हळू हळू पार्टीचे वेध
मनात पिंगा घालू लागले
आता नको नको वाटत सार
पण तसच ओझं घेऊन
सहन कराव लागत सारं
प्रेमापोटी ऋणानुबंध जुळलेत
ते तसेच वृद्धिंगत करण्याचा
हा तर सारा आटापिटा
चार हातावरच प्रेम
असेना का दिखाव्याच
पण आहे हे काही कमी नाही
बर वाटत
आपण कोणाला तरी
हवे हवेसे वाटतो
आणि कंठ दाटून येतो
वाढदिवस असल्याची जाणीव
डोळ्यांच्या कडेला
तो ओला स्नेह
सांज ढळताना करून देतो.....!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
