वाढदिवस
वाढदिवस
एक एक दिवस सरत
वर्षी येतो वाढदिवस
नित्य नवे काही देत
येतो बघा वाढदिवस ......१
नुसतेच वाढतेय वय
असा नसतो वाढदिवस
कडू गोड आठवणी अन्
येतो बघा वाढदिवस ......२
तीन ऋतूच्या तीन तऱ्हा
बघा शिकवतो वाढदिवस
करतो आपलेसे दुर गेलेल्यांना
येतो बघा वाढदिवस........३
नुसतेच नसते खोगीरभरती
अनुभवाचे देणे देतो वाढदिवस
झाले गेले विसरून देतो आनंद
येतो बघा वाढदिवस ......४
