वाचक...!
वाचक...!
याचक होण्या ऐवजी वाचक होऊ.....!!
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपल्याला थोडे दु:ख सहन करायला
काय हरकत आहे....?
आपल्या सुखासाठी उपदेशाचे डोस
वाचक सहन करीत असेल तर
त्याला चांगले म्हणण्यास काय हरकत आहे...?
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एकदिवस देणाऱ्याचे हात घ्यावे
तसे एक दिवस वाचकाच्या सुखासाठी
आपण वाचक होण्यास काय हरकत आहे....?
नाहीतरी गल्लो गल्ली गुरू दिसतात
आज काल ते पावलो पावली भेटतात
याचक बनविण्यासाठी प्रबोधन करतात
म्हणून वाटत याचक बनण्यापेक्षा
वाचक बनलेल बरं, साक्षर बनलेलं बरं
चला वाचक बनू सजग बनू
प्रगतीचा मार्ग धरु
जे हवे ते सर्व करू
यशस्वी होण्या कष्ट करू
जिंकू किंवा मरू
देशाचा झेंडा आपल्या उंच धरू....!
