वाचक...!
वाचक...!
प्रिय वाचक आणि फॉलोअर्स....!
फॉलोअर्स असले की
पाठबळ असल्या सारख वाटतं
मोठ्या जोमाने मग
नित्य एक पाऊल पुढे पडतं
माझी कविता अशी
माझी कविता तशी
अस उगाचच वाटतं
आणि लिहण सहज घडतं
केव्हा केव्हा लेखणीच
घोड पेंड खातं
केव्हा केव्हा विचारांच
घोड ही अडतं
पण अश्या वेळी
अपेक्षांचं थोडं कौतुक वाटतं
आणि मग पुन्हा
घोड जोमाने चौखूर उधळतं
माझ्या फॉलोअर्स लोकांचे
आणि वाचकांचे
आभार मानावेत
तेवढे थोडेच आहेत
तेच तर माझ्या लेखणीचे
खरे शिलेदार आहेत
त्यांच्यामुळेच तर हे
कवितेचे चार शब्द जीवनात आहेत
या शब्दांना आता
फेटा बांधण्याची वेळ आली आहे
कवितेचे कौतुक करण्याची
मुहूर्त वेळ आप्तांनो समीप आहे
वेळीच वाचनाचा
मनमुराद मनसोक्त आनंद घ्या
मतदानाचा हक्क बजावून
मला मतदान करून उपकृत करा
विनंती कवितेतून करणं
म्हणजे आपल्या काळजात
बसणं अस मला वाटतं
म्हणून तर प्रेमाच हे काव्य बाहेर पडतं....!
