STORYMIRROR

Sarika Musale

Inspirational

5.0  

Sarika Musale

Inspirational

उत्तर अजून मिळाले नाही

उत्तर अजून मिळाले नाही

1 min
1.1K



जग चालले 21 व्या शतका

आणि म्हणे स्ञी-पुरुष समानता

तरी का होते स्ञी-भ्रुणहत्या

उत्तर अजून मिळाले नाही


हर क्षेञी स्ञीची आघाडी

स्वावलंबी बनली आजची नारी

तरी जाणवते पुरुषसंस्कृती

उत्तर अजून मिळाले नाही


नारे स्ञीशक्तीचे या जगती

प्रशिक्षण कराटेचे मुली घेती

मग का होते बलात्कारिक नारी

उत्तर अजून मिळाले नाही


स्ञी स्वतःच्या पायी उभी

अजूनही हुंड्यापायी लग्ने मोडती

का जातो आजही हुंडाबळी

उत्तर अजून मिळाले नाही


व्यसनाने होतो जीवनाचा नाश

बायका-लेकरांच्या आयुष्याचा विनाश

का सोडत नाही तंबाकू-दारुचा नाद

उत्तर अजून मिळाले नाही


शिक्षणामुळे झाली जनता साक्षर

सुशिक्षितपणाचे लावूनी अत्तर

सत्मार्गाने का जात नाही

उत्तर अजून मिळले नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational