STORYMIRROR

Rajesh Sabale

Tragedy Abstract

2  

Rajesh Sabale

Tragedy Abstract

।।उशिराचा पाऊस।।

।।उशिराचा पाऊस।।

1 min
3.1K


तुझ्या उशिराचा लई, झाला बघ रं बोभाटा।

लोक पाणीसाठी करी, जीवाचा आटापिटा।।

 

बरं झालं पावसातू जरा, तू उशीराच आला।

विहिरी तळी, तलावाचा, गाळ काढूनही झाला।।

 

सरकारी फाईलींची झाली, आता, धावपळ बाई।

आळशी, पेंगाळल्या माणसाची, झोप गेली बाई।।

 

पावसाने माणसाला, आज खरं जागं केलं।   

जाती भेद विसरून, पाण्यासाठी एक केलं।।

 

रोज ऐकू येते कानी, कर्जापायी जीव गेला।

माय-बाप पोरांचा, जीव टांगणीला लागला।।

 

एक वाईट वाटते, बळी राजाच्या मनाचे।

नको आत्महत्या करु, हाल होती कुटुंबाचे।।

 

धरणी सोशीत बसते, कर्म माणसाचे बाई।

एक थेंब पाण्यासाठी, जीव माणसाचा जाई।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy