STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

तयारी...!

तयारी...!

1 min
27.8K


त गमग सारखी जीवाची होते

या ना त्या कारणाने

रि तच निराशेने जीवन जगण्याची

अंगवळणी नकळत पडते...


आताशा इतक्या वर्षांनी

नवीन वारे संचारले

मार्ग वेगळे अंगीकारणे

आता कर्म प्राप्त झाले...


प्रावलंबी जीवन

आता स्वावलंबी होऊ लागले

नवीन वळण जीवनाला

आपोआप लागले..


दृष्टी तशी सृष्टी म्हणतात

हे काही खोटे नाही

आता दृष्टी बदलण्या शिवाय

पर्याय दुसरा नाही..


प्रत्येक गोष्टीतल्या उणिवा

आता नजरे आड झाल्या

उणिवा सुद्धा नवे मार्ग

दाखवू लागल्या..


मानसिकताच बदलून गेली

जीवनात नवी पहाट झाली

नकारात्मकतेची जागा

आता लीलया सकारात्मकतेने घेतली..


वाईटात सुद्धा चांगले दिसू लागले

नव्या दृष्टीने सुख पुन्हा माघारी आले

दुःखात सुख हसू लागले

सुखात दुःख विरून गेले..


नव्हत्याचे होते झाले

जीवन पुन्हा नवीन घडू लागले

वळणावरचे चुकीचे पाऊल

पुन्हा सरळ पडू लागले..


प्रगती झाली विचारांची

नवसंजीवनी जीवनास मिळाली

माझी चूक माझी मलाच

अंतर्मुख होता आपोआप कळाली..


तयारी अशी मनाची झाली

दृष्टीच सारी बदलून गेली

अडचणीत सुद्धा सोय दिसू लागली

ही किमया अंतर्मुख होण्याने घडली...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational