STORYMIRROR

Padmakar Bhave

Comedy Others

2  

Padmakar Bhave

Comedy Others

तू

तू

1 min
16

तब्येतीला चांगले असतात बदाम 

आणि खारका,

मी कविता लिहितो बरं का...

गाडीत होती गर्दी,त्यात मला सर्दी, 

मी घातली होती ऑफिसची वर्दी,

एकाला म्हटलं जरा सरका

मी कविता लिहितो बरं का....

मी राहतो ती आहे बिल्डींग

माझ्या खिडकीला केलं आहे वेल्डिंग

माझा दरवाजा होतो फोल्डिंग

माझ्या बिल्डिंग मध्ये आहे गुरखा

मी कविता लिहितो बरं का....

मला आवडतो फार चहा

तुम्ही देऊन तर मला पहा

बायको म्हणते चहात आता नहा

मी चहा पितो सारखा सारखा

मी कविता लिहितो बरं का?

नका हसू ,वाचा जरा नीट

मी जास्त खातो मीठ

मला एक दिवस मिळेल ज्ञानपीठ

मी असाच व्यासंग ठेवला जर का

मी कविता लिहितो बरं का

मी कविता लिहितो बरं का

मी कविता लिहितो बरं का......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy