STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

3  

Smita Murali

Inspirational

तू तिथं मी

तू तिथं मी

1 min
505



*तु तिथं मी*


सख्या तुझ्याशी जुळता

प्रितीच्या सुरेल तारा

माझ्या मनमंदिरी सदैव

तुझ्या अस्तित्वाला थारा


असे आपसूक हरवले

माझे अस्तित्व तुझ्यात

आता तूच भासतोस

माझ्या श्वास श्वासात


काय केलीस रे जादू

अशी भुलले मी वेडी

ना घालता काही बंधन

कैद करी प्रेमाची बेडी


सहवासातातून मी जाणले

तुझे निर्मळ प्रेम पदोपदी

तू जपलेस तुझ्या सखीला

जाणवले मज हे घडोघडी


कुठेही जरी असलास तू

हे मन फिरे तुज भोवती

तू तिथे मी असेन सदैव

तूच माझा सखा सांगाती!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational