तुझं अस्तित्व...
तुझं अस्तित्व...
क्षण हा ओथंबलेला
बाळा तुझ्या आगमनाचा
कुस माझी सुखावली
स्पर्श इवल्याशा जीवाचा
चाहुलीने मोहरले
सुख लाभलं मातृत्वाचं
पुन्हा उलगडेन मी
गूज बाळा माझ्या स्वत्वाचं
जुळलीत हृदयाशी
तुझी स्पंदने हळुवार
उरी फुटताना पान्हा
नातं गुंफतं अलवार
