STORYMIRROR

Sunil Khaladkar

Drama Inspirational

3  

Sunil Khaladkar

Drama Inspirational

तुझा गुण....

तुझा गुण....

1 min
190

तुझ्या गुणांचं प्रिये मी,

कसं गं करू शब्दात वर्णन...

तुझं उभं आयुष्य,

तु संसाराला केले अर्पण..||१||


रात्री कधी ही झोपली तरी,

सकाळचा पहिला अलार्म तुझ्यासाठी असतो.

बाकी सर्व आरामात झोपतात,

पण तुझा दिवस सुरु होतॊ...||२||


कधी बनतेस मुलांची माय,

तर कधी बनते ज्ञानरूपी शारदा...

कलह झाला जरी संसारात तरी,

वादावर तूच सामंजस्याने टाकते पडदा.....||३||


पै पै जमा करून,

संसाराची तु भरते घागर....

लक्ष्मीचं साक्षात रूप तु,

अन तूच धन्वंतरीचा सागर...||४||


सांभाळून घेतलेस तु सर्वाना,

प्रसंगी पचवलेस तु हलाहल......

डाग न लागलेले कमळ तु झालीस,

जरी आजूबाजूला असेल कुविचारी चिखल..||५||


तुळशीवृंदावनाच्या पूजेने आमच्या,

घरात कधी ना झालं भांडण....

सडा शिंपडून काढलेल्या रांगोळीने,

सुगंधिले आपले अंगण.....||६||


तुझ्या सारखी भार्या असणं,

नशीबच समजतो माझं...

म्हणूनच सर्व गुणसंपन्नमध्ये,

नाव राहिलं पुढे, फक्त तुझं.....||७||



এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Drama