STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

टेडी डे लावणी

टेडी डे लावणी

1 min
680


(रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे,टेडी डे...!)


कालवा कालव झाली माझी

पाहून टेडी बाई हातात

घेऊन आला बायकोला संगे झोकात...।।धृ।।


दोन दिसापूर्वी गुलाब देऊन

रोज डे साजरा झाला थाटात

गाठले होते सायंकाळी

त्याने बाई मज घाटात...।।१।।


दुसऱ्या दिवशी आला बाई

प्रपोज करण्या मोठ्या ऐटीत

प्रपोज करुनी गेला माघारी

भेटतो म्हणाला तुला सुट्टीत।।२।।


नंतर आला आठवणीने

तोंडात चघळत गोळी लिम्लेट

कर म्हणे माझ्यासाठी पटकन आम्लेट

देवून हाता मध्ये चॉकलेट डे चे चॉकलेट।।३।


भाळले मी ही पाहुन त्याला

वाटले आणेल एक सुबक चन्द्रहार

माहीत नव्हते येईल असा अचानक

बायको संगे करण्या माझी हार।।४।।


पटले मजला पाहुन टेडी

दिलाचा दिलबर आहे चारसो बिस

बायको पाहुन देखणी

जीव झाला बाई माझा कासाविस।।५।।


कालवा कालव झाली माझी

पाहून टेडी बाई हातात

घेऊन आला बायकोला संगे झोकात....।।धृ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational