STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

3  

Sunita Ghule

Inspirational

तृतीयपंथी

तृतीयपंथी

1 min
898




तृतीयपंथी... आम्हांलाही जगू द्या



नियतीचा खेळ सारा

दोष नाही या देहाचा

घृणास्पद,तिरस्कृत

जन्म आम्हां किन्नरांचा।


तृतीयपंथी असलो तरी

हक्क जगण्याचा प्रत्येकाला

आम्हांलाही जगूद्या रे

विनवितो माणसाला।


अन्यलिंगी ,तृतीयपंथी

परी मन,हृदय माणसाचे

प्रेम,सन्मान,विश्वास

दान द्या रे दातृत्वाचे।


नाही विकृती समाजाची

टाळ्या लक्ष वेधण्याला

पोटाच्या खळगीसाठी

पुढे हात पसरला।


आशीर्वाद खरा होतो

सुख लाभेल जीवनी

लेकरांची आयुष्यवृध्दी

शुध्द भावना हो मनी।


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational