STORYMIRROR

Shila Ambhure

Drama

3  

Shila Ambhure

Drama

तृणपाती

तृणपाती

1 min
14.2K


तृणपाती ती

डोंगराच्या कुशीत

सदा खुशीत......1


हिरव्या रंगी

खुलतात नटून

दिसती उठून......2


मुले तृणाची

गंधित रानफुले

खेळती झूले.......3


जीवनगाणे

गोड,मंजुळ गाती

ही तृणपाती........4


संदेश त्यांचा

'जगा दिलखुलास'

साऱ्या जगास.......5



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama