ती पाहताच बाला
ती पाहताच बाला
ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला
सावरी ओढणीला, तिरपा कटाक्ष मजला
सावळी गोड तनू अन्, गोबरे गाल मऊ ते
गालावरीच तीळ, जळवी मम मानसाते
रेशमी कुरळे कुंतल, सावरी वरवरी ती
मध्येच बट चुकार, मम मानसी विराजी
अबोली असावी, का असावी ती रेश्मा!!
प्रेमाच्या नगरी, माझीच ती करिश्मा
ओळख नसे परि, नयनांस भिडती नयन
काहीच आगळे रंग, अलगद मनी तरंग
त्या तरंगातच तरुनी, तिजपाशी मीच गेलो
"एक्सक्युज मी" म्हणूनी, चक्क मिशीमधुनी गोड हसलो
प्रेमपथ माझा तो, विवाहवेदीवरीच गेला
बाला आता नसे ती पत्नीच आज मजला
'तिरपा कटाक्ष' आता रोजचाच झाला
ती पाहताच बाला, कलिजा 'का' खलास झाला?