STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

4  

Abasaheb Mhaske

Inspirational

ती भेटली मज पुन्हा पुन्हा ....

ती भेटली मज पुन्हा पुन्हा ....

1 min
253


ती भेटली मज पुन्हा पुन्हा ....

पावला- पावलावर विविध रूपात

कधी आई , ताई , शाळेत बाई बनून

तर कधी प्रेयसी , मैत्रीण नात्यात


ती भेटली मज पुन्हा पुन्हा ....

निनावी नात्यात ,मनस्वी स्वप्नात

तर कधी स्मृतिशेष आठवण होऊन ...

प्रेमळ,नितळ मनीच्या खोल कप्प्यात


ती भेटली मज पुन्हा पुन्हा ....

असह्य वेदनारुपी जाचात ,पेचात 

तरीही ...आश्वासक मैत्रीण बनून ...

सावलीसारखी सदोदित सोबत करणारी


ती भेटली मज पुन्हा पुन्हा ....

त्याग , समर्पित मूर्तीच्या रूपात

सृजनाच्या पावसात गर्भार भूमीगत

वंशव्रुद्धीसाठी धडपडणारी अर्धांगिनी बनून


ती भेटली मज पुन्हा पुन्हा ....

दोन्ही आघाड्यावर लढणारी मानिनी

अत्याचारावर तुटून पडणारी ,पुरून उरणारी

तर कधी हताश होऊन जीवनयात्रा संपवणारी


ती भेटली मज पुन्हा पुन्हा ....

खंबीर , सोशिक अढळ दीपस्तंभासारखी

मार्गदर्शक ... प्रेरणादायी, सहधर्मचारिणी

दुःखातही सुख शोधणारी कल्पतरू आई  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational