STORYMIRROR

Umakant Kale

Inspirational

2  

Umakant Kale

Inspirational

तहान पाखरांची

तहान पाखरांची

1 min
14K


तहान लागे पाखरांना, शोधती पाणी

रानावनात फिरे पाखरू, ना गवसे नदी

कमी झाली झाडे,संपली हो जंगले

आटले सगळे पाणवठे, आटली नदी

घर हे रान आमचे, हस्तक्षेप का माणसाचे

आकांक्षाची त्यांची तोरणे,आमचे भरडणे

ना भरते पोट मानवाचे, क्रूर वागणे त्यांचे

पाखरांचे महागले हो आता जगणे

दूरवर दिसली वाहती एक नदी

दोन घोट पाण्याने मिटली तृष्णाही

चला पाखरांनो असे ना मिळेल न्याय

आता जगू द्या हो आम्हालाही

इवलसं जग आमचे, इवले आम्ही

नको उध्वस्त करु रानवन संपत्ती आमची

चला करु विचार, देऊ साथ पाखरांना

ही कर्तव्ये आता खरी मानवाची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational