STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Drama Fantasy Thriller

3  

manisha sunilrao deshmukh

Drama Fantasy Thriller

ते आयुष्य माझं नव्हत

ते आयुष्य माझं नव्हत

1 min
248

स्वतःच्याच मनात उपर्यासारखं फिरत होतो....

सुख पुढं येत नव्हत अन्, दुःख पाठ सोडत नव्हत...


भावनांचा बाजार मांडून पहिला मी,

बघून जात होते पण वाटून घ्यायला कोणी येत नव्हत..


म्हटल आयुष्य ऐकदाच मिळते जगून बघू बेफिकरिने..

मोठ्या मनाने गेलो, आपल्याचयात पण आपल पण कुठेच दिसत नव्हत.....


मग म्हटल साथ नको कुणाची एकटाच नडू सगळीकडे..

पण संकटाचे ते फेरे डोकं वर काढू देत नव्हत...


सरतेशेवटी एक कळल ओझ आपण कोणाच व्हायचं नहीं

पण बघितल स्वतःच कडे तेव्हा, माझच मन हलक नव्हत...


झालं गेलं सर्व आता हसरा चेहरा घेवून जातो सगळीकडे

नजर मिळत होती समोरच्याला तेव्हा डोळ्यातून कही लपत नव्हत...


स्वप्न पहिली होती मोठी की आयुष्य वेचील आनंदाने...

जागलो कोणासाठी माहिती नव्हत...

पण ते आयुष्य माझं नव्हत...ते आयुष्य माझं नव्हत...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama