STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

1.0  

Prashant Shinde

Inspirational

तबला..!

तबला..!

1 min
28.1K


तबला पाहुनी

हृदयी उमटती

सहजी बोल ते

ता धिं धिं धा


संगीत काराची

सदैव उडते

चाली साठी

तिरकीट त्रे धा


बोल कवींचे

नाविन्याचे

वाटते हे कसले

काय कामाचे


गणित सोडविता मनाचे

अप्रूप वाटते कवनाचे

कसब पाहुनी गायकाचे

कौतुक वाटते बोलांचे


ताक सूर लय

क्षणात जमता

संगीत देतो तो

न दमता


काळ वेळ काही

सांगून येत नाही

चाल ही तशीच

वेळेवर कधी सुचत नाही


तरीही तबला

जेंव्हा बोल काढतो

तेंव्हा कोठे संगीतकाराचा

जीव भांड्यात पडतो....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational