स्वप्नातला गाव
स्वप्नातला गाव
त्या तिथे डोंगराच्या पलीकडे...
आहे माझ्या स्वप्नातला गाव
नाही तिथे जात - पात, धर्मभेद दरी
सुखाने नांदतात नर - नारी, सारी...
रुसवे फुगवे, हेवे दावे असले तरी...
परस्पर समझोता होतोच भारी
खडतर जगणं तरी सुकर जगण्याची हमी
नात्यांची घट्ट वीण तसूभरही कमी नाही...
विज्ञानाच्या वारूवर स्वार होऊन...
विकास अन् प्रगती नांदते तिथे
व्यर्थ भ्रमंती विसरून सारी
अखंड मानवतेचे गीत निनादते...
सुजलाम् - सुफलाम्, सुंदर बने...
पोरं- सोरं, गुरं - ढोरं, तरुण - तरुणी
सारेच कसे कर्मयोगी, हरहुन्नरी
आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे...
कायदा नाही फक्त तिथे कर्तव्यनिष्ठा...
प्रेमाचे व्यवहार सकळांचा फायदाच फायदा
चार पिढ्या सुखाने नांदाव्यात आशावाद असा
स्वर्गाचा साक्षात्कार याहूनही वेगळा कसा ?
