सूत्र सुखाचे
सूत्र सुखाचे
सुख लाभे नशिबाने
पूर्वजन्म प्राक्तनाने
सुख दुःख ललाटीच
लिहिलेले ईश्वराने
तरी सुख सूत्र असे
शोधलेले मानवाने
दैव जरी प्रतिकूल
देई तोंड स्वाभिमाने
सूत्र सुखाचे तयास
सापडते आचरणे
ऊर्जा अंगी सकाराची
नितनूत पालवणे
येवो कितीही आपदा
हास्य मुखकमलात
कुणा वाटे किती सुखी
दुःख ठेवी अंतरात
दुःख स्वतःचे सोडूनी
धावे दुःखी जनांकडे
दीन दुबळे पाहूनी
सेवेसाठी धावे पुढे
जगे परोपकारार्थ
लाभे सुख मानसिक
नसे स्वार्थ माहितीच
खरा सुखी अंतरिक
एक सूत्रचि सुखाचे
जाण दुःख परक्याचे
अश्रू पुसावे दीनांचे
सुख लाभे अंतरिचे