STORYMIRROR

Subhash Charude

Inspirational

2  

Subhash Charude

Inspirational

सत्य

सत्य

1 min
3.2K


गालामधले हास्य निराळे

डोळयामधले भाव वेगळे

मनी जरीही किती कामना

कधी ना लपती सत्य भावना

सत्य जरीही कटू असले

असत्यानेही भाग्य नासले

कर जोडूनी भाग्य तुझे

करी तुला याचना

कधी ना लपती सत्य भावना

असत्याचा बघ वारा वाहे

जो तो आपुला स्वार्थ पाहे

स्वार्थासाठी जगतो का रे

मनी ठेवी कामना

कधी ना लपती सत्य भावना

वागू नका हो असत्य जीवनी

सत्याने ही सजवा अवनी

असत्याला नका थारा देऊ

कधी तव जीवना

कधी ना लपती सत्य भावना

असत्याचेही जिणे क्षणभर

सत्याची तू आस मनी धर

सत्याने तू वाग जगती

हीच  तुला प्रार्थना

कधी ना लपती सत्य भावना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational