स्त्री आमचा अभिमान
स्त्री आमचा अभिमान
ती आई असते
ती बहीण असते
ती सखी असते
ती बायको असते
तिच्या एवढं जीव कोणी लावू नाही शकत
कारण ती स्त्री असते
ती माया लावते
ती पाठिंबा देते
ती मैत्री जपते
ती सर्वांना सांभाळते
तिच्या एवढी साथ कोणी नाही देऊ शकत
कारण ती स्त्री असते
ती हुशार
ती रणरागिणी
ती सुंदरी
ती कर्तृत्ववान
तिच्या एवढं शक्तिशाली कोणीच नाही होऊ शकत
कारण ती स्त्री असते
ती मार्गदर्शक
ती यशाची पायरी
ती सुख
ती आयुष्य
तिच्याएवढं प्रेम करणारी कोणीच नाही होऊ शकत
कारण ती स्त्री असते
