गर्जतो महाराष्ट्र माझा...
गर्जतो महाराष्ट्र माझा...
गर्जतो महाराष्ट्र माझा ...
दिवस हक्काचा,
दिवस कामगारांचा...
दिवस मानाचा,
दिवस मराठमोळ्या मातीचा...
अनंत संकटे सोसूनही,
कणखर असे माझे राष्ट्र...
टाकावा जीव ओवाळून,
असा हा माझा महाराष्ट्र...
शिवरायांची जन्मभूमी,
शेतकऱ्याने इथे केली प्रगती...
प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी,
हीच आहे आमची संस्कृती...
पर्वत झालो तर “सह्याद्रीचा” होईन,
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन...
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन
आणि
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन...
|| जय जय महाराष्ट्र माझा ||
