शिवबाचा छावा
शिवबाचा छावा
पुरंदराच्या कडेकपारी नाद तोफांचा गुंजला
आई सईच्या पोटी धर्मवीर संभाजी राजा जन्मला...
लहानपणीच तलवारबाजी शिकून तर सज्ज केले स्वत:ला
शिवरायांची सावली बनून जपले त्यांनी स्वराज्याला...
त्यांच्या नावाचा दरारा, शक्तीयुक्तीचा गनिमी कावा
झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा...
माती तुळापुरची पावन झाली तुमच्या रक्ताने
ते साखळदंड झालेत, धन्य तुमच्या स्पर्शाने...
पाहुनी शौर्य तुमचा पुढे, मृत्युही नतमस्तक झाला
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला...
| जय भवानी जय शिवाजी |
