माझ पाहिलं प्रेम
माझ पाहिलं प्रेम
कुठून येतात कुणास ठावूक
तुझ्या आठवणी चे घाव
शांत,मगणं असले तरी हृदयात,
कोरून जातात ते बेचैनी चे भाव...
कुठून येतात कुणास ठावूक
तुझ्या असण्याचा सुगंध,
नकळत तुझ्या नादात मी होऊन
जाई धुंद.....
कुठून येतात कुणास ठावूक
तुझ्या दाटलेला आभासांचा सोहळा,
टकमक वाट पाही हा जीव माझा भोळा....
कुठून येतात कुणास ठावूक
तुझ्या रिमझिम पावसाचा झोका,
पुन्हा नव्याने सुरवात करू तू मला
फक्त दे एक मोका....

