आपले सैनिक
आपले सैनिक
बलिदान परम धर्म
याच पालन करतो तो।
घरच्यांना खोटी आस
देऊन सीमेवर जातो तो।
उरात न बुजणारी मशाल
पेटवून मैदानात लढतो तो।
रातो राती जागून देशाची
सेवा करतो तो।
सुख, दुःख मागे ठेऊन
सीमेवर वर राबतो तो।
उद्या जगायला मिळेल की
नाही याची खंत मनात
ठेऊन जगत नसतो तो।
तुमच्या बलिदानाची ज्योत आता प्रत्येकाच्या
मनात पेटू दे....
तुमच्या आठवणी कायम आमच्या
हृदयात कोरू दे...
तुमचे धाडसाचे गुणगाण आता
आम्हाला ही गाऊ दे...
कधी न विसरता येतील हे क्षण...
तुम्हाला मानाची सलामी
करतो आम्ही अर्पण......
