शिवछत्रपती राया
शिवछत्रपती राया
शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट
रायगडावर आली शिवभक्तांची लाट,
डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट
अशा आपल्या राज्याच्या राज्याभिषेकाची पाहतोय आम्ही वाट
रायगडी मंदीर वसे माझा राया
चरणाशि अर्पितो आजन्म ही काया,
जगदिश्वराशीजोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती...
स्वराज्य जपणे हा त्यांचा एकच ध्यास
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस,
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आपले शिवाजी राजे झाले आज छत्रपती...
शिवनेरी ते थेट रायगड हा प्रवास होता अगदी महान
ज्यांच्या मुळे स्वराज्याला लाभले अनेक वीर बलवान,
अवघ्या इतिहासात ज्यांची ख्याती दिगंती
असे आपले राजे झाले आज छत्रपती...गणकर
