कलंच नाही मला
कलंच नाही मला
कलंच नाही मला...
प्रेमाच्या वाटेवर भेटलास तू मला
डोळ्यातून हृदयात कधी मिसळलास
हे कळलंच नाही मला...
सुने सुने माझे विश्व होते सारे
तुझ्या येण्यानेच हा गुलमोहर फुलला कसा,
हे कळलंच नाही मला...
मी सुंगंध शोधत राहिले फुलांमध्ये
तू माझ्या हृदयात अत्तराची कुपी ओतलीस कधी,
हे कळलंच नाही मला...
मी तुलाच शोधत राहिले सभोवती...
तू माझा कधी झालास,
हे कळलंच नाही मला...

