STORYMIRROR

Jakruti Dingankar

Drama Inspirational

3  

Jakruti Dingankar

Drama Inspirational

जन्मदाते आई बाबा

जन्मदाते आई बाबा

1 min
226

पूर्वजन्माची पुण्याई असावी

जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,

जग पाहिलं नव्हतं तरी,

नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!


हळूच मला मिठीत प्रथम घेतलं

डोळयात अश्रू येता येता त्यानी स्वतःला सावरलं,

हातात हाथ धरून ज्याने चालवायला शिकवलं

रक्ताचं पाणी करून मला वाढवलं...


बघता बघता वेळ निघून गेले

आज कळी चे मी फुल झाले,

आयुष्यात तुम्ही नेहमी मला आनंदात ठेवले

स्वतःचे अश्रू लपवून मला नेहमी हसविले...


काटे फिरवून कसे घेऊ माघे क्षण

ओटी नाव तुमचे मनी तुमची आठवण,

ओळवतात डोळे आठवतो तो क्षण

 माराणा ओ मीठी तुमची येते आठवण...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama